संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

धम्मम तामिळ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान गाजतोय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते स्व. सुनील दत्त आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या गौतम बुद्धांच्या विचारावरील आम्रपाली या चित्रपटानंतर आता दक्षिणेतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पा.रंजिता यांच्या धम्मम या तामिळ चित्रपटाचा ट्रेलर सध्या तुफान गाजतोय.या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक लहान मुलगी गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या खांद्यावर उभी राहून आपल्या वडिलांशी बोलत असलेला संवाद तर काही मराठी भाषिकांनी तामिळमधून मराठीत भाषांतरीत करत व्हिडीओवर टाकले आहेत.
दिग्दर्शक पा.रंजिता यांनी आतापर्यंत असूरन,काला,कबाली,जयभीम यासारखे तामिळ भाषेतील आणि डब केलेले हिंदीतील चित्रपट सुपर डुपर ठरले आहेत.रंजिता यांनी आपल्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांमध्ये वंचित आणि सोशित दलितांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सर्वच भाषेतील सिनेरसिकांच्या मनात त्यांचे हे चित्रपट घर करून गेले आहेत.धम्मम या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक मुलगी गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या खांद्यावर उभी राहते.त्यावेळी तिचे वडील तिला या मूर्तीवर उभी राहू नकोस असे म्हणतात.त्यावेळी ही मुलगी म्हणते की,बुद्धाने तर स्वतःला कधीच देव मानून घेतले नव्हते.त्यांना लोकांनी दिलेले देवत्वपण त्यांनी नाकारले होते.मग तुम्ही गौतम बुद्धांना दे का मानता असे वडीलांना प्रत्युत्तर दिले,असे दाखवले आहे.या संवादाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच गाजू लागला आहे.त्यांच्या या चित्रपटामुळे सोशल मीडियावर बुद्ध विचारधारेची चर्चा होऊ लागली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami