संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

धारावीच्या यल्लमा मंदिरात जबरी चोरी; मौल्यवान दागिन्यांसह दानपेटी लंपास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – धारावी परिसरातील महात्मा गांधीनगर येथील प्रसिद्ध माता यल्लमा देवी मंदिरात अनोळखी चोरट्यांनी जबरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने, ८ तोळे वजनाचा चांदीचा हार आणि मंदिरातील दानपेटी असा ऐवज लुटून नेला आहे. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवता असलेल्या यल्लमा देवीचे मुंबईच्या धारावीतही मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami