संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

धार्मिक नाव आणि चिन्ह वापरावरून कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : धार्मिक नावे आणि चिन्हे असलेल्या राजकीय पक्षांविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली असून,सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या धार्मिक नावांच्या आणि चिन्हांच्या नावाबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सय्यद वसीम रिझवी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. जे राजकीय पक्ष त्यांच्या नावात आणि निवडणूक चिन्हांमध्ये धर्म आणि धार्मिक चिन्हे वापरत आहेत त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षेप घेण्यात आला होता. वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. ज्यात धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर आहे, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे. न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक आयोग आआणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami