नाशिक : राज्यात अनेक मुस्लीम लेखकांनी मराठीतून लेखन केले आहे. मुस्लीम साहित्य संमेलन हे त्याचे पुढचे पाऊल आहे. याविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ते प्रगतीसाठी योग्य असल्याचे आपले मत व्यक्त करत, व्यक्ती आणि समाज यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी कुंठीत झाली आहे असे, अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.
शनिवारी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार तथा ज्येष्ठ लेखक हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हेही उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष मुकादम यांनी साहित्य लेखनाची गरज, त्याचे विविध प्रकार याविषयी सातत्याने चर्चा होत असल्याचे सांगितले. तसेच व्यक्ती आणि समाज यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी कुंठीत झाली आहे. यामुळे ते समाज शोषणाचे बळी ठरतात. यातून मुक्तीसाठी ते प्रयत्न करत नाही. परंतु, काळाच्या ओघात हे चित्र बदलत आहे, असे मत येथे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित नवव्याअखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. माध्यमांशिवाय आत्मविष्कार होऊ शकत नाही, प्रत्येक कला प्रकाराला स्वतंत्र असे माध्यम आहे. सामाजिक विषयांवर निर्माण होणारे साहित्य ही नाण्याची दुसरी बाजू आहे. राज्यात अनेक मुस्लीम लेखकांनी मराठीतून लेखन केले आहे. मुस्लीम साहित्य संमेलन हे त्याचे पुढचे पाऊल आहे. याविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ते प्रगतीसाठी योग्य आहे. या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित होत असतील तर त्याचाही विचार केला जाईल, असे मुकादम यांनी नमूद केले.