संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

धावत्या विदर्भ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन युगुलाची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा – जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळच एका तरुण – तरुणीने रात्री शेगाव ते नागझरी दरम्यान नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.यातील मृतक तरुण हा जवळच असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कवठलं गावचा २२ वर्षीय अजय असल्याची ओळख पटली आहे.तर १४ वर्षीय युवती ही त्याच परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोंदिया- मुंबई सुपरफास्ट विदर्भ एक्स्प्रेस ही गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेगावकडे येत असताना नागझरी ते शेगाव दरम्यान व शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळ नागरिकांना दोघांचे मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी दोघांचे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात आणले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता दोघांची ओळख पटली असून दोघे प्रेमी युगुल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून यातील मुलगी ही फक्त १४ वर्षांची असून युवक २२ वर्षांचा आहे. दोघेही जवळच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठल परिसरातील आहेत. मात्र त्यांनी आत्महत्या का केली…? यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami