धुळे – धुळ्यात कोरोनाचा आलेख दिवसागणित वाढताना दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात सोमवारी दहा कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असल्यामुळे धुळेकरांच्या तसेच आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, त्याचबरोबर अद्यापही कोरोनाची लस घेतली नाही; अशा नागरिकांनी तात्काळ आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.