नंदुरबार- नंदुरबार जिल्हा मिरचीचे आगार म्हणून म्हणून ओळखला जातो. तसेच नंदुरबार ही देशातील चौथ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे.नंदुरबारची ठसकेबाज लवंगी आतापर्यंत या मिरची आगाराची शान बनली आहे. मात्र आता ही लवंगी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून हद्दपार झाली आहे.या लवंगीच्या जागेवर लालभडक मिरची दिसू लागली आहे.
नंदुरबार बाजारपेठेत काही वर्षापूर्वी लवंगी मिरची ही वेगळीच शान असायची. लवंगी मिरची भारी तिखट असते. तिचा ठसका अन्य कुठल्याही मिरचीत दिसून येत नाही. अशी ठसकेबाज लवंगी गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेत दिसेनाशी झाली. तिच्या जागेवर लालभडक मिरची दिसू लागली आहे.लवंगीचे उत्पादन दिवसेंदिवस घटू लागले आहे.मिरची उत्पादक शेतकरी अलीकडे लवंगी ऐवजी लालभडक मिरची आणि व्ही.एन.आर वाणाच्या मिरचीच्या लागवडीला प्राधान्य देऊ लागला आहे.त्यामुळे लालभडक मिरचीची आवक वाढताना दिसत आहे.
शहराबाहेर मिरची पथारीवर लालभडक मिरचीचा सडा दिसून येत आहे.