संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नंदुरबारमध्ये तीन ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीने सरपंच विराजमान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – नंदुरबारमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल तीन ग्रामपंचायतींच्या सरंपच पदाचा फैसला हा ईश्वर चिठ्ठीने झाला आहे.तसेच सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे.

नवापुर तालुक्यातील गडद ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दिनकर पातळ्या गावित यांना १९१ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिनेश लाजरेस गावित यांनाही १९१ मते मिळाली.यामुळे एका मुलाला बोलवून ईश्वर चीट्ठी काढली. यामध्ये दिनकर गावित यांची निवड झाली.तर याच तालुक्यातील बिलमांजरे गावातील सरपंच पदाच्या उमेदवार निलिमा राहुल गावीत व मिनल याकूब गावीत यांना ४३८ मते पडल्याने त्यांच्यात देखील ईश्वर चिठ्ठी काढुन फैसला करण्यात आला आहे. यात निलीमा गावित विजयी झाल्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा फैसला देखील ईश्वर चिठ्ठीने झाला आहे. जिल्ह्यातील तीन सरपंच पद तर चार सदस्यांच्या या ईश्वर चिठ्ठीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami