संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरविणार्‍या चौघांच्या टोळीला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गडचिरोली – नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस पथकाने चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडील नक्षली साहित्य जप्त केले आहे.

जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलिस स्टेशन हद्दीतील भंगारामपेठा गावात उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोलिस स्टेशनचे जवान व शीघ्र कृती दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. यावेळी काही इसम तेलंगणामधुन दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे नक्षलवाद्यांना काही साहित्य पोहोचवण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यामुळे सापळा रचून त्यांच्याकडून १० कार्डेक्स वायरचे ३५०० मीटर लांबीचे बंडल व इतर नक्षल साहित्य जप्त केले. याप्रकरणी राजु गोपाल सल्ला (३१), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (२४), साधु लच्चा तलांडी (३९), मोहम्मद कासिम शादुल्ला यांना अटक केली आहे. तर छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे हा फरार झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami