संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नगर- आष्टी  रेल्वेचा शुभारंभ मुंडे भावा बहिणीत वाद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड: अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू झाला आहे.नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू झाली आहे. या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होत्या.
बीडच्या राजकारणातील मुंडे भाऊ-बहिणीत आजच्या दिवशीही वाद झाला. महाविकास आघाडी सरकारने तीन वर्ष निधी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे या प्रकल्पाला उशीर झाल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडेंनी केला. मात्र या आरोपावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही मविआ सरकारने या प्रकल्पाला कशी गती दिली, याचे स्पष्टीकरण देत ट्विट केले आहे. नगर परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. आजपासून ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस नगर-आष्टी आणि आष्टी-नगर या मार्गावर ही रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन नगरहून निघाल्यानंतर नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा, कडा या स्थानकांवर ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. नगरहून पहिली ट्रेन दररोज सकाळी ७.४५ ला सुटणार आहे. ही ट्रेन आष्टीत १०.३० वाजता पोहोचेल. आष्टीहून स. ११ वाजता ट्रेन सुटेल, तर नगरमध्ये ही ट्रेन दुपारी १.५५ वाजता पोहोचेल, असे रेल्वे वेळापत्रकात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami