संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

नरेश म्हस्केंचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदेंचे समर्थक नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काल संध्याकाळी ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या घरासमोर नरेश म्हस्के यांनी शिंदे समर्थकांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे शिवसेनेकडून कोणत्याही क्षण कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्याआधी त्यांनी राजीनामा दिला.
भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा…जात, गोत्र अन् धर्म अमुचा… शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची राष्ट्रवादी गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!, असं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज ठाण्यात शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami