संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा! अधिकाऱ्याचेही आक्रमक शैलीत प्रत्युत्तर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एका हिंदू 19 वर्षे युवतीचा काल अपहरण झाले. या लव्ह जिहादच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी आज राजापेठ पोलीस ठाण्यात आक्रमक होऊन प्रचंड वाद घातला. नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरडा केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक झाले होते. नवनीत राणा यांनी आरोप केला आहे की, लव्ह जिहाद प्रकरणाच्या तक्रारीदरम्यान मी पोलिसांना फोन केला होता आणि पोलिसांनी फोन रेकॉर्ड केला. त्यामुळे नवनीत राणा संतापल्या होत्या . रेकॉर्डिंगचे अधिकार कोणी दिले असे पोलीस अधिकाऱ्यावर ओरडल्या.

नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात प्रचंड आकांडतांडव केले. त्यामुळे या पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांचा संयमही सुटला. त्यांनी नवनीत राणा यांना उद्देशून या सगळ्यांना आधी इथून बाहेर काढा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवनीत राणा आणखीनच संतापल्या. त्यांनी आणखी आक्रमकपणे हातवारे करत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारायाला सुरुवात केली. मात्र, पोलीस ठाणेदारानेही नवनीत राणा यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. संबंधित पोलीस ठाणेदारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि शेवटपर्यंत राणा यांना त्यांच्या पद्धतीत प्रत्युत्तर देत राहिला. अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आले.

मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. मात्र अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या. यावेळी नवनित राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली.

यानंतर नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही मागासवर्गीय आहोत, म्हणून पोलीस आम्हाला अशी वागणूक देत आहेत. ज्या कुटुंबातील मुलगी गायब आहे, ते कालपासून रडत आहेत. दोन तासांत आमची मुलगी समोर आणा, असा अल्टिमेटम मी पोलिसांना देऊन आल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी म्हटले की, मुलीचे आई-वडील माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते की, मुलीला अंधारात ठेवून तिचे लग्न झाले आहे. याबाबत मी पोलीस ठाण्यात फोन केला असता पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. त्यांना माझा कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला. मुलीचे अपहरण झाले आहे. त्यांनी त्याला शोधून समोर आणावे.१९ वर्षांची हिंदू मुलगी आहे . मुलगा पकडला गेला आहे. रात्रीपासून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र मुलगी कुठे आहे, याचे उत्तर दिले जात नाही. मुलाच्या घरच्यांना घेऊन या, तासाभरात सर्व काही बाहेर येईल. मीडियाशी बोलताना मुलीच्या पालकांनी सांगितले की, माझी मुलगी 12.30 वाजता बँकेत गेली होती. मात्र नंतर त्यांचा फोन बंद आला. अटक केलेला मुलगा आमच्या घरी कधीच आला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami