संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

नवनीत राणांच्या अमरावती जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुखांवर रात्री गोळीबार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

अमरावती – काल दिवसभर मुंबईत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने वातावरण तापलेले पाहायला मिळाले. त्यातच राणा दाम्पत्याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अमरावतीत शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडल्याने अमरावतीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

योगेश घारड यांच्यावर वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोर गोळ्या झाडून पसार झाला. घराड यांच्यासोबत असलेल्या नंदू काळे व अन्य सहकाऱ्यांनी हल्लेखोराचा पाठलाग केला मात्र तो हाती लागला नाही. राहुल तडस असे हल्लेखोराचे नाव असल्याचे आता सांगण्यात येत आहे. योगेश घारड यांच्या डाव्या मांडीला गोळी लागली असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami