संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिरात ‘पेड ई-पास`

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त प्रथमच पेड ई-पासचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ‘पेड ई-पास` सुविधेची अंमलबजावणी केली जाणार आहे. याचा लाभ दररोज मर्यादित भाविकांना घेता येणार आहे. याबाबत माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली. या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. पेड ई पासची किंमत माणसी 200 रुपये असणार असून त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तत्काळ बुकिंग करून पास मिळणार आहे.यंदाचा अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार आहे. अंबाबाईच्या दर्शनाला यावर्षी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरासरी 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, यावेळी हा आकडा मोडीत निघण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami