संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

नवाब मलिकांना दिलासा; कोर्टाने केल्या त्यांच्या तिन्ही मागण्या पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पण, आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी मलिक यांनी केली होती. ती मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ६ दिवस त्यांचा मुक्काम हा ईडी कोठडीत राहणार आहे. मलिक यांनी काल मुंबई सत्र न्यायालयाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या.

नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. नवाब मलिक यांनी काल कोर्टात विनंती केली होती की, त्यांना इडी कस्टडीत असताना घरचे जेवण देण्यात यावे तसंच तपासादरम्यान त्यांचे वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि औषधी देण्याकरिता परवानगी देण्यात यावी या तिन्ही मागण्या केल्या होत्या. काल या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मलिक यांना कोठडी घरचे जेवण मिळणार आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान मलिक यांचे वकील उपस्थितीत राहणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami