नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका; वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यास मज्जाव

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात रोज-रोज नवे आरोप करणार्‍या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टाने आज मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात 9 डिसेंबरपर्यंत कोणतेंही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत वानखेडे कुटुंबाबाबत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे हमीपत्र मलिकांनी वकिलांद्वारे मुंबई हायकोर्टाला दिले.

नवाब मलिक यांच्यावर समीर वानखेडेंच्या वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा केला असून मलिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबांची बदनामी करत आहेत. आपल्या कुटुंबाची माहिती सार्वजनिक करत असून याचा आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने नवाब मलिक यांना 9 डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबीयाबाबत कोणतेही वक्तव्य सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदेमध्ये करण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतर हायकोर्टात मलिकांच्या वकिलांनी सादर केलेल्या हमीपत्रात 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीपर्यंत समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत कोणतेही वक्तव्य प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Close Bitnami banner
Bitnami