नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल, क्रांती रेडकरची माहिती

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला याला अटक केल्यापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप होत आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती अभिनेत्री आणि समीर वानखे़डे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

एनआयशी बोलताना क्रांती रेडकर म्हणाल्या की, ”निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्याने आणि त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे.”

पुढे त्या म्हणाल्या की, “आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल.”, असा आरोप देखील क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे. 

Close Bitnami banner
Bitnami