संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

नवाब मलिक यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊही ईडीच्या रडारवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ कप्तान मलिक हे सुधा इडीच्या रडारवर असून त्यांनाही इडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. दरम्यान आपल्याला ईडीकडून कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाही, असे कप्तान मलिक यांनी सांगितले.

मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याशी संबंधित प्रकरणात त्यांचे जवळचे नातेवाईक सुद्धा सहभागी असावेत असा ईडीला संशय आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता असून त्याचाच एक भाग म्हणून नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांचीही चौकशी केली जाणार आहे, त्यासाठी कप्तान मलिक यांना इडीचे समन्स मिळालेले आहे. मात्र कप्तान मलिक यांनी ईडीकडून समन्स मिळाल्याचा इन्कार केल आहे. तसेच या प्रकरणी जास्त काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami