नवी मुंबई – देशातील दुसरे आणि राज्यातील पहिले नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नवी मुंबईत आता ५० मजली टोवर उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच याठिकाणच्या इमारत उंचीबाबत घातलेली अट शिथिल केली आहे.या निर्णयामुळे बिल्डर लॉबीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या २० किलोमीटर परिसरातील इमारतींना उंचीबाबतची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत इथल्या प्रस्तावित विमानतळ परिसरात उभारल्या जाणाऱ्या इमारतींना उंचीचे बंधन होते.२०१८ पासून हा नियम पाळला जात होता. त्यामुळे या परिसरात टोवर सारख्या उतुंग इमारती बांधता येत नव्हत्या.मात्र २२ जुलै रोजी नागरी विमान खात्याचे अधिकारी,विमानतळ प्राधिकरणअधिकारी ,
सिडकोचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक पार पडली.यावेळी ही मान्यता देण्यात आली.आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून संबधितांना ना हरकत प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे.तसेच ५५.१ मीटर उंचीपेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या विकासकाला त्यासाठी अर्ज करता येणार आहे. ही उंची १६०.१० मीटर उंचीपर्यंत असू शकते.त्यामुळे आता नवी मुंबईतही मुंबईप्रमाणे उंचच उंच इमारती दिसू लागतील असे नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष हरेश छेडा यांनी म्हटले आहे.
दरम्यान ,सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी या निर्णयाबाबत म्हणाले की,हा निर्णय जनतेच्या हिताचा असून यात एमएमआर क्षेत्राचा चांगला होईल.