संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

नव वित्त वर्षारंभ – आर्थिक नियोजन हवेच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आर्थिक व्यवस्थापनाबाबत गेली दोन वर्षे अनेकांसाठी मोठी आव्हानात्मक ठरली. लॉकडाऊन, कॅस्ट कटिंग, अनएम्प्लॉयमेंट, ठप्प व्यवसाय बंद तसेच कोरोनामुळे वैद्यकीय खर्चासह वैश्विक महासाथीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक फटका बसला आहे. मात्र यानिमित्ताने गेल्या दोन वर्षांत आर्थिक नियोजनाचे महत्त्वही अनेकांना कळून चुकले आणि अशी आर्थिक घडी नव्याने बसविण्यासाठी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपेक्षा चांगली वेळ निश्चितच नाही.

आता वर्षात नेमके याच वेळेला का? खरेतर नवीन आर्थिक वर्ष म्हणजे मागील वर्षाच्या आर्थिक ध्येयांचे पुनरावलोकन करणे आणि आर्थिक स्थिरता व अनिश्चितच काळासाठी सुरक्षिततेच्या खात्रीसाठी अधिक ठोस योजना तयार करणे होय. पुढील वर्षभरात आर्थिक ताण येऊ नये यासाठी एंजेल वन लिमिटेडचे समभाग धोरणकर्ते ज्योती रॉय हेदेखील काही महत्त्वांच्या बाबींवर भर देतात. नवीन आर्थिक वर्षासाठी अशी चेक-डू लिस्ट खूपच गरजेची आहे.

खर्चांवर नियंत्रण ठेवणे : यापूर्वी कधीच आर्थिक नियोजन केले नसेल तर खर्चांवर नियंत्रण ठेवणे हे योग्य आर्थिक नियोजनाच्या दिशेने उचललेले सर्वोत्तम व पहिले पाऊल आहे. आपण कुठे व किती खर्च करतो हे माहित असेल तर बचत व गुंतवणूक कुठे करावी हेदेखील आपसूकच समजते. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध खर्च व्यवस्थापन ॲपची मदत घेता येऊ शकते. यामध्ये सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद करता येते. असे करताना आपण खर्चांचे उत्तमरित्या पुनरावलोकन करू शकतो आणि त्याअनुषंगाने खर्च करतो. मात्र अगोदरपासूनच तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवत असाल तर तुम्हाला काय करायचे आहे हे निश्चितच माहित असते. नवीन वर्षासाठी आर्थिक नियोजन उत्तमरित्या समजण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो आणि खर्चांचे पुनरावलोकन करता येते.
ध्येयांचे पुनरावलोकन: पुढील पायरी म्हणजे तुमच्या आर्थिक ध्येयांचे पुनरावलोकन करा. प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेतनामधून काही रक्कम विशिष्ट ध्येयांसह बचत, गुंतवणूक इत्यादींसाठी वेगळी ठेवतात. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पुन्हा एकदा या ध्येयांकडे लक्ष देता येते आणि नवीन वर्षासाठी नवीन लक्ष्यांची भरही टाकता येते. जसे की – 10 वर्षांनंतर घर खरेदी करण्याचे नियोजन करत असताना मात्र वाढत्या उत्पन्नासह लवकरच ते ध्येय साध्य करू शकता. म्हणून घर खरेदी करण्यासाठी बचत करणा-या मासिक रक्कमेमध्ये वाढ करू शकता.

गुंतवणूक पोर्टफोलिओचे पुनरावलोकन : गुंतवणूक होत नसेल तर गुंतवणुकीला सुरूवात करून प्रबळ गुंतवणूक पोर्टफालिओ निर्माण करण्याची ही उत्तम वेळ आहे.गुंतवणूक पोर्टफोलिओ असेल तर त्याचे पुनरावलोकन करता येते. नियमित कालांतराने पुनरावलोकन केल्यास उपलब्ध निधी कोणते आहेत याने गुंतवणुकीची कामगिरी समजण्यास मदत होते. काही अडथळे असल्यास त्यांना दूर करणे सर्वोत्तम निर्णय आहे. मात्र त्यासंदर्भात सावधगिरी बाळगणे अत्यंच गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही एक वर्षाहून अधिक काळापर्यंत योग्य कामगिरी करत नसलेल्या फंड्सबाबत पुनर्विचार केला पाहिजे. मात्र योग्य कामगिरी होत नसताना संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे.

विमांचे पुनरावलोकन : गुंतवणूकदार विमा संरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र आपत्कालिन स्थितीत अशा पर्यायची उत्तम मदत होते. प्रत्येक व्यक्तीसाठी, विशेषत: तो/ती कुटुंबामधील कमावती व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींसाठी आरोग्य विमा व जीवन विमा महत्त्वाचे आहेत. म्हणून विमांची मुदत संपत आली असेल तर त्यांचे नूतनीकरण करायला हवे. तसेच नुकतेच विवाह किंवा बाळाच्या जन्मामुळे कुटुंबाच्या सदस्यांमध्ये वाढ झाली असेल तर विमांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

कर नियोजन : आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कर नियोजन. तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला कर नियोजनाची सुरूवात केली तर त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्याकडे गुंतवणुकांचे गणन करण्यासाठी आणि कराच्या अधिकतम रक्कमेची बचत करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. तुम्ही वर्षभरात या गुंतवणूका वाढवू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami