संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

नांदेडच्या हिमायत नगरमधील भीषण अपघातात ५ मजूर ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हिमायत नगरजवळ सोनारी फाटा येथे शनिवारी रात्री ९ च्या सुमारास दोन ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात ५ मजूर जागीच ठार झाले, तर अन्य ५ जण जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हिमायत नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
नांदेडच्या हिमायत नगर जवळच्या सोनारी फाटा येथील करंजीजवळ शनिवारी रात्री आयशर आणि सिमेंटचा ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. तो एवढा भीषण होता की, त्यामुळे दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. त्यात ५ मजूर ठार झाले. इतर ५ मजूर जखमी झाले आहेत. त्यांना हिमायत नगर सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. हे मजूर बिहारचे आहेत. रेल्वेच्या कामासाठी आले होते. काम आटोपल्यानंतर आयशर ट्रकमधून ते हिमायत नगरला जात होते. तेव्हा हा अपघात झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami