संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

नांदेडात सचखंड गुरुद्वारातर्फे २३ पासून तख्त स्नान ऐतिहासिक धार्मिक सोहळा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड- मागील दोन दशकांपासून नांदेडचा तख्त स्नान हा धार्मिक सोहळा भाविकांच्या आकर्षणाचा बिषय बनला आहे.गुरुद्वारा तख्त सचखंड साहिबद्वारा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तख्त स्नान,दीपावली आणि गुरुतागद्दी हा सण २३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जाणार आहे. यावेळी पंजप्यारे साहिबान यांची उपस्थिती लाभणार आहे.शीख धर्मियांच्या पाच तख्तांपैकी म्हणजेच धर्मपीठांपैकी एक पवित्र पावन तख्त नांदेड येथे तख्त सचखंड श्री हजूर साहेब नावाने विराजमान आहे.

यंदा दोन वर्षानंतर प्रथमच गुरुतागद्दीचा हा कार्यक्रम महाराजा रणजित सिंघ प्रांगणात पार पडणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी तख्त स्नान,दुसऱ्या दिवशी २४ रोजी दीपावली महल्ला आणि २७ त३ ३० ऑक्टोबर पर्यंत गुरुग्रंथ साहिब भवन येथे गुरुता गद्दी समारोह आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमामध्ये शीख पंथातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने आणि प्रवचने दररोज रात्री ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत होणार आहेत.हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजीच शहरातील विविध ठिकाणी समापन होईल.या सर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी,विभाग प्रमुख आणि इतर कर्मचारी तसेच पोलीस ,वाहतूक विभाग,अग्निशमन दल आदींना योग्य ती व्यवस्था करून सहकार्य करण्याचे आवाहन गुरुद्वारा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami