संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

नांदेड महापालिका आयुक्त लहानेंची बदली रात्रीतून रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याच्या नगर विकास विभागाने केलेल्या आयुक्त बदलीचा खेळाची सध्या परभणीत जोरदार चर्चा आहे. परभणी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या नांदेडचे महापालिका आयुक्त डॉ सुनील लहानेंची बदली रात्रीतून रद्द करण्यात आली. आता त्यांच्या जागी तृप्ती सांडभोर यांची परभणीच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. तृप्ती सांडभोर या पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या.
परभणी महापालिकेच्या आयुक्त देविदास पवार यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी 30 ऑगस्ट रोजी नांदेड महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली होती. नगर विकास विभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने 30 ऑगस्ट रोजी नियुक्तीचे आदेश काढले होते. अवर सचिव लक्कसे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र ती नियुक्ती औट घटकेची ठरली. एकाच रात्रीतून डॉ सुनील लहाने यांची बदली रद्द करण्यात आली आणि त्यांच्या जागी पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली. तर परभणी महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांची अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे तीन वेगवेगळे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत. नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार या पदस्थापनेत अंशत: बदल करुन तृप्ती सांडभोर यांची परभणी महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे डॉ. सुनील लहाने हे नांदेड वाघाळा मनपा आयुक्त पदावर पुढील आदेशापर्यंत कार्यरत राहतील, असे आदेशात म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami