नागपुरात भाजपला धक्का; रवींद्र भोयर यांचा राजीनामा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नागपूर – विदर्भात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूरातील भाजपचे नेते आणि रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज सोमवारी सकाळी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटू भोयर पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. माजी उपमहापौर व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असलेले डॉ.भोयर हे काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांनी अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून त्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही, असेही बोलले जात आहे.

डॉ. भोयर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून ते संघाशीही जुळले आहेत. त्यांच्या बंडखोरीने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, डॉ. भोयर हे पक्षांतराच्या निर्णयावर ठाम होते. डॉ. भोयर यांनी आज सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे नेते व राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व काँग्रेसचे विदर्भातील नेते उपस्थित होते. डॉ. भोयर यांच्या पक्षांतराने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Close Bitnami banner
Bitnami