संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नागपुरात राज ठाकरे पोहोचताच मनसैनिकांकडून जंगी स्वागत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाच दिवशीय विदर्भ दौरा सुरू झाला आहे. आज सकाळी सुमारे 3 वर्षांनंतर ते नागपुरात दाखल होताच मनसैनिकांवर जोरदार घोषणा देत शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी रवीभवनात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष बांधलकीबाबत चर्चा केली. तसेच आपल्याजवळ 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. घरोधरी जाऊन जोरदार काम करा, अशा सुचना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्याना दिल्या.
आज सकाळी साडेआठ वाजता राज ठाकरे विदर्भ एक्स्प्रेसतून प्रवास करत नागपूरमध्ये दाखल झालेे. त्यावेळी त्यांच्या स्वागताला नागपूर रेल्वे स्टेशनला शेकडो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडावे लागले. पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. राज ठाकरे स्टेशनहून थेट हॉटेलवर पोहोचले.चहापान आवरुन त्यांनी नागपूरच्या रवीभवनात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. याबैठकीत पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहे. त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरात पोहोचा आणि पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, सोमवारीही त्यांचा नागपूरात मुक्काम असेल. ते मनसे नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते चंद्रपूरला रवाना होतील. तेथे पक्षाच्या विभागवार बैठका होतील.20 आणि 21 सप्टेंबर रोजी अमरावतीत विभागवार बैठका घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. 22 सप्टेंबरला राज ठाकरे मुंबईत परतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami