डोंबिवली- भाजपा भटके-विमुक्त आघाडीचा राज्यव्यापी अधिवेशन गुरुवार २२ डिसेंबर रोजी नागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजे दिवसभर आयोजित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावन्नकुळे,भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आ.नरेंद्र पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ओबीसी मंत्रालयाचे अतुल सावे तसेच राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड,खासदार प्रीतम मुंडे, डॉ.विकास महात्मे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे
या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातील भटके विमुक्त महिला पुरुष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येच्या सहभागी आहेत.महाराष्ट्र भटके-विमुत जातीच्या ५२ पोटजाती आहे.त्यासाठी वसंतराव नाईक महामंडळासह स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.नागपुरात होणार्या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. भाजपचे काम या समाजात वाढले पाहिजे.तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती या समाजाच्या कार्यकर्त्यांना समजावी यासाठी हे अधिवेशन घेण्यात आले आहे.