संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

नागपूरनंतर आता मुंबईत बेस्टच्या
बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कर्नाटक नव्याने पहा ” इंग्रजी भाषेतील मजकूर

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच पेटत चालला आहे. बेळगावच्या हिरे बागेवाडीजवळ कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती,त्यानंतर हा वाद चांगलाच भडकला.तसेच कर्नाटक सरकारच्या पर्यटनाचे बॅनर नागपुरात लावण्यात आल्याने महाराष्ट्रात गदारोळ पाहिला मिळाला होता.मात्र हे होत असतानाच आता थेट मुंबईतील बेस्ट बसवरच आता कर्नाटकच्या जाहिरातीचे बॅनर झळकल्याने मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान,राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे आणि आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांनी ट्विट करत
सरकारच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध केला आहे.
‘ कर्नाटक नव्याने पहा ” असे वाक्य इंग्रजी भाषेत नमूद केलेल्या या जाहिराती आहेत.राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी बेस्ट बसचा फोटो पोस्ट करत फोटोवर लिहिले आहे की.”एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असताना दुसरीकडे मात्र नागपूर नंतर मुंबईतील बेस्ट वर कर्नाटक पर्यटनाची जाहिरात केली जात आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत.तर आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकच्या लोकांना आमचा विरोध नाही.परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नबाबत मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा.
दरम्यान, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकिकडे महाराष्ट्रातून विरोध होत आहे तर दुसरीकडे कर्नाटक सरकारच्या जाहिरातींचे पोस्टर मुंबई लावले जात आहेत. नागपुरात लावलेले पोस्टर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडले होते. मात्र हे थेट बेस्ट बसवर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर पाहिला मिळत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या