संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

नागपूर- तुळजापूर महामार्गावर अचानक धावत्या ट्रकने घेतला पेट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्धा – नागपूर – तुळजापूर महामार्गावरील सेलू चौरस्त्यावर गांधी पेट्रोल पंपासमोरून भरधाव जात असणाऱ्या मालवाहू मिनी ट्रक वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

तसेच अग्निशमन दलाच्या गाडीने या आगीवरती नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले असून यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मिनिट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काव्या मिनी ट्रान्सपोर्टचा मालवाहू पिकअप मिनी ट्रक सिंदी रेल्वे शहरातून वर्ध्याच्या दिशेने भरधाव जात असताना दरम्यान सेलूच्या गांधी पेट्रोल पंपाजवळ वाहनाला ब्रेक लागत नसल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले.आणि वाहनातून धूर निघत असल्यानचे दिसताच त्यांनी कसेबसे वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले व वाहनाबाहेर चालक पडला. तोपर्यत संपूर्ण वाहनाला आगीने आपल्या कवेत घेतले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami