संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

नागरिकांनी तळजाईवर कुत्री आणू नये, कुत्र्याचे लाड घरी करा, गादीवर झोपवा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी तळजाई वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत अधिकाऱ्यांचे कान टोचले. तसेच पुणेकरांना टोमणे मारले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा, पण इथे तळजाईवर नको, असे म्हणत अजित पवारांनी तळजाईवर मॉर्निंग वॉकला येताना कुत्रे घेऊन येणाऱ्या पुणेकरांना टोमणा मारला आहे.

अजितदादा फक्त उद्घाटन करून थांबले नाहीतर त्यांनी वनोद्यानाची चांगली लांबलचक रपेटही मारली. बांबू वृक्षारोपणही केलं, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या. तसेच एका पक्ष पदाधिकाऱ्याने नाश्ता विचारताच मी दीक्षित डायट वर असल्याचे गुपितही सांगून टाकले. तळजाईवर 1 रूपया पार्किंग चार्ज लावतात आणि पुणेकर ओरडतात, काही पठ्ठेतर थेट कोर्टातच जातात. पुणेकरांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. अरे कोर्टात जाण्याआधी पहिले चर्चेला तर या. सरकारी चर्चेतून मार्ग काढता येतो, असेही अजित पवार म्हणाले.

कोरोनाच्या काळात अनेकांना आरोग्याची काळजी किती घ्यायला हवी हे समजले. त्यावेळी महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने विमानाने ऑक्सिजन आणण्याची तयारी केली होती. सध्या अधिक झाडे लावायची गरज असून निसर्गाला सुट होतील अशीच झाडे लावली पाहिजेत असेही ते म्हणाले. तळजाई परिसरात काही ठिकाणी चुकीची काम झाली आहेत, ती लवकरच काढून टाकणार आहे. त्याचबरोबर प्राण्यांच्या अनाथालयासाठी 22 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami