संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नायजेरिया तुफान पाऊस! २७ राज्यांना मोठा फटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अबुजा- पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे.गेल्या आठवड्यात नायजेरियाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने देशातील दोन धरणे ओसंडून वाहू लागल्याने ३६ पैकी २७ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती.ती शक्यता खरी ठरली असून आतापर्यंत या तुफानी पावसाने ४० जणांचे बळी घेतले आहेत.तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. त्यांच्या सर्व प्रकारच्या हजारो हेक्टर शेतजमिनी पाण्यात नष्ट झाल्या आहेत.
देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील जिगावा राज्याला या विध्वंसक पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरे कोसळून लाखो लोक बेघर झाले आहेत.७० वर्षांच्या आडो औदू कर्णया या वयस्कर नागरिकाने सांगितले की,माझ्या संपूर्ण आयुष्यात असा पाऊस आणि विध्वंस कधी पाहिला नव्हता.यंदा संपूर्ण वर्षभरात ३०० हून जास्त लोक पुरामुळे दगावले आहेत. त्यात गेल्या आठवड्यात २० लोकांचा पुराने बळी घेतला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami