संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

नायब तहसिलदार दीपाली पंडीत
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राजापूर
राजापूरच्या नायब तहसिलदार दिपाली पंडीत राजापूर पंचायत समितीकडे जात असताना भटाळीमध्ये पोलीस लाइन्सजवळ त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना कालरात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्या जखमी झाल्याने राजापुरात एकच खळबळ उडाली आहे.
दीपाली पंडीत या मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलीस लाइनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यानी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यात त्या बालंबाल बचावल्या आहेत . त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला. दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. दरम्यान याच रस्त्याने येणाऱ्या काही पोलिसांच्या निदर्शनास त्या रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आल्याने त्याना सदर पोलीसानी राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. ज्याठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तिथपासून राजापूर वनविभागाचे कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. तर येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या