संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

नारायणगव्हाण घाटात बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी! प्रवाशांचे हाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- नारायणगव्हाण घाटात शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास खासगी बस बंद पडली, त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना घाटात बसून रात्र काढावी लागली.
पुण्यातून संभाजीनगरकडे निघालेली खासगी बस शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास नारायणगव्हाण घाटात आली तेव्हा ती बंद पडली. त्यामुळे घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यात अडकलेल्या वाहन चालक आणि प्रवाशांना घाटात बसून रात्र जागून काढावी लागली. यात महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami