सिंधुदुर्ग:- ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेदरम्यान नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने ओळखला जाणारा हा जिल्हा आता दहशतवादी जिल्हा कसा झाला?
सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी २०१५ मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, राणेंचे राजकारण गलिच्छ पातळीवर चालत आहे, असे अंधारेंनी म्हटले आहे.दरम्यान सुषमा अंधारे यांची कणकवलीत सभा झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सीआरपीसी कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस दिली होत्या. आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली होती.