संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

नाशिकचे सुपुत्र मेजर नारायण मढवई यांना हिसारमध्ये वीरमरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

येवला – भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक येथील सैनिक नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला आहे. हिसार येथे रणगाडा व मोटारसायकलीच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. मढवई यांच्या निधनामुळे चिंचोडी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

यासंदर्भात येवला तालुक्याचे आमदार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ही वार्ता ऐकुन अतिशय दु: ख झाले. शेतकरी कुटुंबातून पुढे येत सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने मढवई कुटुंबासोबत संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी शहीद जवान मेजर नारायण मढवई यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. असा शोकसंदेश भुजबळ यांनी पाठवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami