संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

नाशिकच्या उपमहापौरांसह ४ नगरसेवक शिवसेनेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – महापालिका निवडणुका जशाजशा जवळ येत आहेत तसतसा फोडा फोडीच्या राजकारणाला उत येत आहे. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चार नगरसेवकांनी आज शिवबंधन हाती बांधले. यात विद्यमान उपमहापौर भिकुभाई बागुल, सुफी जीन, मुशीर सय्यद आणि हेमलता कांडेकर यांचा समावेश आहे. तर माजी उपमहापौर प्रथमेश गीते हे सुद्धा शिवसेनेत जाणार आहेत.

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपात मोठी नाराजी आहे आणि याच नाराजीचा फायदा घेत शिवसेनेने भाजपच्या काही नगरसेवकांना गळाला लावले आहे. यात वसंत गीते यांची मोठी भूमिका असल्याचे समजते. वसंत गीते हे सध्या शिवसेनेत आहेत तर त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गीते भाजपचे नगरसेवक आहेत. मात्र तेही आता शिवसेनेत जाणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. तर दुसरीकडे मनसेचे काही नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami