नाशिक- नाशिक तालुक्यातील लहिवत गावातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे संतोष विश्वनाथ गायकवाड यांना सिक्किम येथे कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. ऐन दिवाळीत ही बातमी समजताच लहवितसह संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात शोककळा पसरली होती. संतोष गायकवाड यांच्यावर उद्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संतोष यांची भारतीय सैन्य दलात वीस वर्षेे सेवा झाली होती. दहा महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. देवळाली महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. जेव्हा ते सुट्टीवर येत तेव्हा महाविद्यालयास आवर्जुन भेट द्यायचे. एअरमन म्हणून ते महाविद्यालयात प्रसिध्द होते.