संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नाशिकच्या फर्निचर उद्योजकाची अपहरण करून मालेगावात हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात शाळेचे बेंच बनविणाऱ्या एका फर्निचर कारखान्याच्या संचालकांचा मृतदेह आढळून आल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.शिरीष गुलाबराव सोनवणे असे या मृत उद्योजकाचे नाव त्यांचे अपहरण करण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे.
प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून शिरीष सोनवणे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शिरीष सोनवणे यांचा के.जे.मेहता हायस्कूलजवळ नाशिकरोड एकलहरे रोड येथे स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या गाडीतून ते कोणास काही न सांगता निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच कारखान्यात कामाला असलेला नोकर फिरोज लतीफ शेख याने या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनला तपास यादी रवाना केल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी तीन टीम तैनात करण्यात आल्या होत्या, त्यापैकी एक टीम शिंदेगाव टोल नाका येथे तर दुसरी टीम घोटी टोल नाका येथे रवाना केली होती. तर एक टीम स्थानिक पोलीस स्टेशन तपास करीत होती. तसेच शिरीष सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सायतार पाडे शिवारात पाट कॅनल मध्ये शनिवारी १० सप्टेंबर रोजी पाण्यात आढळून आला.
दरम्यान, यासंदर्भात मालेगाव पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला.तसेच शिरीष सोनवणे यांचा खून का करण्यात आला याबाबत पोलीस कसून शोध घेत असून त्यांचे अपहरण कोणी केले याचाही शोध घेत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami