संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

नाशिकच्या रुई गावात 5 जूनला कांदा परिषद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक- नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये 1982 नंतर दुसर्‍यांदा कांदा परिषद भरणार असून शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या 5 जूनला रुईत होणार्‍या कांदा परिषदेत शेतकरी एकत्र येणार आहे.

सध्या कांद्याला 1 रुपये ते 3 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा जनावरांना खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी कांदा परिषद आयोजनाबाबत माहिती दिली होती. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई गावात 5 जून रोजी भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami