नाशिक- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नाशिक मधील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला.या गोळीबारात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे . या घटनेमुळे नाशिक मधील माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपींचा शोध सुरु आहे.
नाशिक शहरातील सिडको परिसरात राहणारे प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री शहरातील एका मेडिकल स्टोर जवळ उभे होते. याच दरम्यान मोटार सायकलवरून दोन अज्ञात हल्लेखोर तेथे आले आणि प्रशांत जाधव यांच्यावर त्यांनी दोन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली तर एक गोळी तांच्या मांडीला लागली . दरम्यान या घटनेनंतर परिसरात घबरहाट माजली आणि पळापळ सुरु झाली त्याचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले . त्यानंतर या हल्ल्यात जखमी झालेल्या जाधव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. आता पोलीस प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत त्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत हा हल्ला बांधकाम व्यावसायिकांकडून झाला असावा अशी शहरात चर्चा आहे.