संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

नाशिकमध्ये पहिले लष्करी शस्त्रास्त्र प्रदर्शन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या शस्त्रास्त्रांचे ‘नो युवर आर्मी’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. हे प्रदर्शन दोनदिवसीय असून नाशिकच्या ईदगाह मैदानावर होणार आहे. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी पूर्णतः खुले राहणार असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल संतोष पांडा यांनी दिली.

तोफखाना केंद्राच्या द्रोणाचार्य सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. ‘सामान्य नागरिकांना देशाच्या सैन्यदलाचे सामर्थ्य लक्षात यावे आणि शक्तीशाली आधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन घडावे, या उद्देशाने भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशानुसार अशा प्रकारचे पहिले लष्करी शस्त्रास्त्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले आहे,’ असे कर्नल पांडा म्हणाले.

दरम्यान, राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचे प्रदर्शन नागरी वस्तीतील मैदानावर होत आहे. जनतेला तोफखान्यातील शक्तीशाली, आधुनिक तोफा दाखविल्या जाणार आहेत. तसेच रडार सिस्टीम, भूदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून दाखविले जाणारे प्रात्याक्षिकांसह तोफखान्याच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन- वादनाचा अनुभव घेता येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या