संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नाशिक जिल्ह्यात साकारले जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक: वाढते शहर व वाढते प्रदुषण यामुळे चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे, त्यांचा किलबिलाट वाढावा, त्यांना खाण्यासाठी धान्य मिळावे या हेतूने हे बर्ड फीडर बनविण्यात आले आहे. या विश्वविक्रमाद्वारे जगभरात हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न आहे. पिंपळगाव बसवंत येथील अमी जीवदया संस्थेद्वारे जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर तयार कऱण्यात आले आहे. १५४३ पाऊंड (७०० किलो) धान्य बसेल इतके अजस्त्र बर्ड फीडर असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे..

अमी जीवदया संस्था २००९ पासून पशुसंवर्धनासाठी काम करीत आहे. या अगोदर हा विक्रम अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया येथील विल्यम डान ग्रीने या रिटायर्ड शिक्षकाने केला होता. त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रिकार्डस मध्ये होती. तो रिकार्ड मोडुन आता १५४३ पाऊंड चे बर्ड फीडरची नोंद झालेली आहे. अमी जीवदया संस्थेचे अध्यक्ष पिंपळगाव येथील हरीश हिरालाल शाह यांनी सांगितले की, एवढे मोठे बर्ड फीडर बनविणे हे आमच्या कुवतीच्या बाहेर होते, परंतु अनेक लोकांच्या सहकार्यांने ते झाले.यामध्ये आर्किटेक्ट म्हणून योगेश वाघचौरे यांनी डिझाईन करुन दिली ज्यामध्ये ७५ किलो धान्य बसत होते.नंतर त्यामध्ये सुधारणा करुन या स्वरुपात बनविण्याचे ठरले. या बर्ड फीडरचे सर्व माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस संस्थेला पाठविली व त्यांनी ३० आँगस्ट २०२२ ला माझ्या बर्ड फीडरची नोंद जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर म्हणून केली व त्याचे प्रमाणपत्र मला पाठविले असल्यची माहिती त्यांनी दिली. सदर बर्ड फीडर हे रानमाळा, पिंपळगांव येथे बघण्यासाठी ठेवलेले आहे. या फीडरला १०८ खिडक्या असून त्यामध्ये दिवसभरात हजारो पक्षी धान्य चुगण्यासाठी येत असल्याचे समजते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami