संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नासाने इतिहास घडवला! लघुग्रहापासून पृथ्वीला वाचवले, डार्ट मिशन यशस्वी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आज इतिहास घडवला. पृथ्वीच्या दिशेने वेगाने झेपावत असलेल्या लघुग्रहाला अंतराळ यानाने धडक देऊन त्याची दिशा आणि गती बदलली. त्यामुळे लघुग्रहाच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचवण्यात यश आले. नासाच्या डार्ट मिशनने हाती घेतलेली ही मोहीम फत्ते झाली. त्यामुळे आता भविष्यात पृथ्वीला अशा लघुग्रहापासून पृथ्वीला वाचवणे शक्य झाले आहे, असे जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स प्रयोगशाळेच्या मिशन कंट्रोलने जाहीर केले.

अंतराळात अनेक लघुग्रह आहेत. फ्रिजपासून कारपर्यंतच्या आकारांचे हे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. त्यातील अनेक लघुग्रह वातावरणातील घर्षणामुळे अपोआप नष्ट होतात. परंतु काही ग्रहांपासून पृथ्वीला धोका निर्माण होतो. तेव्हा पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक लघुग्रहांची दिशा व गती बदलण्यासाठी आणि पृथ्वीला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी नासाने डार्ट मिशन हाती घेतले होते. त्याची पहिली चाचणी आज सकाळी झाली. त्यात डार्ट मिशनच्या यानाने अंतराळातील डिडिमॉसच्या डिमॉफोर्स नावाच्या लघुग्रहाला धडक दिली. ताशी २४ हजार किलोमीटर वेगाने झालेल्या या टक्करीमुळे त्याला आपली कक्षा आणि दिशा बदलावी लागली. या लघुग्रहाची लांबी १६९ मीटर होती. त्यामुळे पृथ्वीला त्याच्यापासून असलेला धोका टाळला. या मोहीमेसाठी नासाचे हे अंतराळ यान अवकाशात १० महिने तैनात होते, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. नासाचे डार्ट मिशन यशस्वी झाल्यामुळे आता भविष्यात अशा लघुग्रहांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचवणे शक्य झाले आहे. अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांना अशा प्रकारे यानाने धडक देऊन त्यांची दिशा आणि गती बदलणे शक्य असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. या यशस्वी प्रयोगामुळे नासाने नवा इतिहास घडवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami