संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

नितिन गडकरींकडून पालखी मार्गाची हवाई पाहणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती :- महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. हा महामार्ग ‘हरित मार्ग ‘करण्यात यावा या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या