संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

नितीश कुमार यांच्या दिल्लीत भेटीगाठी! राहुल गांधी यांच्याशी तासभर चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे, विरोधक एकत्र आले तर बरे होईल.नितीशकुमार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे भेट झाली.

बिहारमध्ये काँग्रेस समर्थित महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची ही पहिलीच भेट होती. बिहार सरकारला काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आभार मानले आहेत. त्यासोबतच दोन्ही नेत्यांमध्ये 2024 च्या निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा झाली आहे. या बैठकीत समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या शक्यतेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. रविवारीच राहुल गांधींनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीशकुमारही एकत्र येण्याचा सल्ला देत आहेत.

देशात विरोधी पक्षांना एकत्र करून मजबूत पक्षाविरोधात आघाडी उभी केली जात असताना नेता निवडण्यावरून याआधी गदारोळ झाला आहे. आणीबाणीनंतर जनसंघ, ​​भारतीय क्रांती दल, समाजवादी पक्ष, काँग्रेस फॉर डेमोक्रसी यांनी मिळून जनता पक्षाचे सरकार स्थापन केले. तेव्हा मोरारजी देसाई, जगजीवन राम आणि चौधरी चरणसिंग यापैकी एकाला पंतप्रधान बनवण्याचा मान राखला गेला. बाबू जगजीवन राम पंतप्रधान होणार होते, पण मोरारजी देसाईंना अखेरची पंतप्रधानपदाची खुर्ची मिळाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami