संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

निती आयोग आणि फोन पेतर्फे हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन; पाच लाखांचे मिळणार बक्षीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

फिनटेक इंडस्ट्रीचे महत्व विषद करण्यासाठी निती आयोग आणि फोन पे ने हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन केलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी असून २५ तारखेपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. या हॅकाथॉनमधील विजेत्यांची घोषणा 28 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता live सेशन द्वारे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी https://cic.niti.gov.in/fintech-open-month-hackathon.html. या लिंक वर क्लिक करा.

एकूण पाच लाख रुपयांची आकर्षक रोख बक्षीस या विजेत्या संघाला देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी एका संघाची निवड होणार असून त्यांना दीड लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी दोन संघ निवडण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तर, तृतीय क्रमांकासाठी दोन संघ निवडण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत सादर केलेल्या हॅकनुसार, परीक्षक कमी किंवा जास्त विजेते निवडण्याचा निर्णय घेऊ शकतात.

नेमकी काय स्पर्धा आहे?

स्पर्धेच्या आयोजकांनी काही नियम दिले आहेत त्या नियमानुसार स्पर्धकांनी आपला ॲप तयार करायचा आहे. स्पर्धकांनी त्यांच्या ॲपमध्ये खालीलपैकी कोणत्या तरी एका गोष्टीचा समावेश करणे गरजेचे आहे.

  1. हॅकाथॉनमधील सहभागींनी बेस म्हणून अकाऊंट एग्रीगेटरसारख्या प्रोग्रामसह PhonePe पल्स सारखे कोणतेही ओपन-डेटा API वापरणे आवश्यक आहे.
  2. आर्थिक समावेशावर भर देऊन कर्ज, विमा किंवा गुंतवणुकीसाठी पर्यायी रीस्क मॉडेल
  3. वित्तीय सेवांचा व्यापक अवलंब करण्यासाठी वेगवेगळे डेमोग्राफिक्स आणि भौगोलिक क्षेत्रांसाठी पॉवर डेटा सिग्नल वापरणारे नवनवे प्रोडक्ट्स
  4. डिजिटल पेमेंट डेटामधून प्राप्त केलेले व्हिज्युअलायझेशन आणि इंटिलिजन्स

स्पर्धक त्यांचे हॅक विकसित करण्यासाठी खालील सँडबॉक्स प्लॅटफॉर्म वापरू शकतात.

  • Setu AA Sandbox
  • Setu Payments Sandbox
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami