संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

नितेश राणेंची अँजिओग्राफी रद्द, आजची रात्रही जाणार रुग्णालयात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे न्यायलयीन कोठडीत होते. मात्र, अटक झाल्यापासून त्यांची तब्येत खराब झाली होती. दरम्यान, आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांची आजची रात्र कोल्हापुरातील रुग्णालयात जाणार आहे. दुपारी त्यांच्या छातीत दुखत होतं, तसंच रात्रभर उलट्या सुरू असल्याने डॉ़क्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आहे.

नितेश राणे यांना उच्च रक्तदाब आणि चक्कर येत असल्याने सिटी अँजिओग्राफी आज करण्यात येणार नाही, असे कारण कोल्हापुरातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे राणेंची चिंता वाढली आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर सिटी अँजिओग्राफी आज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जामीन मंजूर मिळाल्याचे पत्र अद्याप सीपीआर रुग्णालयाला मिळालेले नाही अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवासांपासून नितेश राणेंची तब्येत अस्थिर आहे. त्यांच्यावर छातीत दुखत असल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री उलट्याही झाल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ही मोठी अपडेट दिली आहे.

नितेश राणेंच्या अडचणी संपेनात

नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये असेही कोर्टाने ठणकावले आहे. मात्र आता जामीन मिळून प्रकृती खालावल्याने चिंता वाढली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami