संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांच्याविरीधात सुरु असलेल्या एसीबीच्या चौकशीविरोधात उद्धव ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले असून कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून वैभव नाईक यांच्या विरोधातील पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा केला आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, चौकशीला समोरे जायचे. मोर्चा काढून काय होणार आहे, अ
वैभव नाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात एसीबीची चौकशी का केली जात आहे. वैभव नाईक यांनी चौऱ्या करायच्या, भ्रष्टाचार करायचा, बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे. तरीदेखील नाईक यांच्या बाजूने हे नेते उभे राहात आहेत. २००९ ते २०१९ या काळात ५०लाख रुपयांची संपत्ती ७ ते ८ कोतो रुपये झाली. ही बेहिशोबी मालमात्ता का वाढली, हे नाईक यांनी सांगावे. नाईक यांच्यावर जनतेची जबाबदारी आहे. मी स्वच्छ आहे, हे नाईक यांनी सांगायला हवे होते. माझी सर्व संपत्तीचा हिशोब आहे. मी सगळे कर भरतो असे नाईक यांनी सांगायला हवे होते. स्वत:ला लपवण्यासाठी सामान्य शिवसैनिकाला वेठीस धरले जात आहे. स्वत:ची चोरी लपवण्यासाठी पक्षाला वेठीस धरले जात आहे. वैभव नाईक यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. एसीबी, सीबीआय, ईडी, आयटी या नामांकित संस्था आहेत. या संस्था कोणत्याही विषयाची चौकशी करतात तेव्हा त्यांच्याकडे संबंधित व्यक्तीचे पुरावे असतात. त्याशिवाय ते चौकशी करत नाहीत. आमच्याही चौकशा झालेल्या आहेत. या चौकशींदरम्यान आम्ही माहिती दिलेली आहे,असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami