संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कणकवली – संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना आज कोर्टाकडून कोणताच दिलासा मिळालेला नाही. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरु झाली होती. मात्र विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यास वेळ मागितल्याने ही सुनावणी सोमवारपयर्र्ंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर हा खटला मुख्य न्यायालयात वर्ग करण्यावरही सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना सोमवारपयर्र्ंत न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. नितेश राणेेंची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे, याच आधारे जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी जामीन अर्जात केली आहे. यावर न्यायालयाने आज दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील न्यायालयात आज हजर झाले होते. मात्र सरकारी विशेष वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करत वेळ मागितला.

तसेच जिल्हा न्यायालयात अर्जावर म्हणणे मांडायला पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात आली. नितेश राणे यांचे प्रकरण आर. बी. रोटे या न्यायाधिशांकडून दुसर्‍या न्यायाधिशांकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणीही सरकारी वकिलांकडून करण्यात आली. या सरकारी वकिलांच्या अर्जावरही सोमवारी सुनावणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami