संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांची प्रकृती बिघडली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्ररकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या न्यायालयीन कोठीत आज १८ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता जामिनासाठी अर्ज करणार आहेत. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांनी प्रकृती बिघडली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आहे. त्यामुळे नितेश राणेंची आजची रात्र ही जिल्हा रूग्णालयात जाणार आहे.

निलेश राणे यांची तब्येत खालावल्याने त्यांना ओरोस येथील वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना नितेश राणे ओरोस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेतर नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राकेश परब यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, उद्या सकाळी ५ फेब्रुवारी दोघांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे २ फेब्रुवारीला कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले होते. यावेळी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची व राकेश परब यांची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याने नितेश राणे यांना १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर पोलिसांनी राकेश परब आणि नितेश राणे यांची समोर समोर बसून चौकशी केली. कारण राकेश परब हे त्यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांच्या मोबाईलवरूनच नितेश राणे यांचे हल्लेखोरांशी संभाषण झाले झाले होते. तसेच चौकशीसाठी नितेश राणे यांना गोव्यातील कळंबेंट्ट येथील हॉटेलवर नेले. तसेच, या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सुरवातीला कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक सचिन हुंद्लेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, सागर खंडागळे आणि इतर पोलीस होते. तिथे त्यांची चौकशी करून नंतर त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील घरत यांनी नितेश राणे यांना तपासासाठी पुण्याला न्यायचे आहे. त्यामुळे आणखी आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी न्यायालाल्याकडे मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी जोरदार विरोध केला. पुण्याशी नितेश राणे यांचा काहीही संबंध नाही ही केस खोटी आहे. शिवाय आर्थिक व्यवहाराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत पोलिसांनी नितेश राणेंचा मोबाईल ताब्यात घेतला पण त्यांना त्यातही काही पुरावे मिळालेले नाहीत आणि मुख्य म्हणजे नितेश राणे यांनी यापूर्वी तीन ते चार वेळा पोलिसांना चौकशीत सहकार्य केले आहे असे असताना आता पोलीस कोठडी मागणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तो न्यायालयाने मान्य करून नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालालीन कोठडी दिली आहे. नितेश राणे यांच्या सह राकेश परब यानाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडी मिळताच नितेश राणे यांच्या वकिलांनी ओरस येथील जिल्हा सत्र न्यायालयात जमिनाठी अर्ज केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami