नाशिक – परराज्यातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे निफाडच्या घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळले. हे दर १०० ते ८० रुपये कॅरेट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोच्या लागवडीचा खर्चही निघत नाही, असे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
वातावरण बदलाचा फटका शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही बसला आहे. भाजीपाला, कांदा आणि गुळाचे भाव वाढले आहेत. असे असताना दुसरीकडे टोमॅटोची बाजारात आवक वाढली आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो येत आहे. त्यामुळे ५०० ते ६०० रुपये कॅरेट विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. आता १०० ते ८० रुपये कॅरेट टोमॅटोचा भाव झाला आहे. त्याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.